* आमदार किशोर पाटील यांच्या विकासकार्याने प्रभावित ; लोहटार - खडकदेवळा गटात शिवसेनेला बळ
पाचोरा / प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे कट्टर समर्थक व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे तसेच विधानसभा निवडणुकीत लोहटार - खडकदेवळा गटाची धुरा सांभाळणारे धडाडीचे कार्यकर्ते डी. डी. नाना यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असून, शिवसेनेला ग्रामीण भागात बळकटी आणणारा हा महत्वाचा प्रवेश मानला जात आहे.
कार्यक्रमात भावी जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील, माजी जि. प. सदस्य दिपक राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, माजी सरपंच आर. आर. पाटील, माजी सरपंच अरुण पाटील व शिवसेना शाखा प्रमुख धनराज पाटील आदी उपस्थित होते.
डी. डी. नाना यांनी विश्वास व्यक्त करतांना म्हटले की, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेल्या विकासकामांमुळे पाचोरा - भडगाव मतदारसंघात विकासाची नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश करीत आहे. भागातील जनतेच्या विकासासाठी तत्पर राहीन. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नानांच्या प्रवेशाचे स्वागत करीत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नानांच्या प्रवेशामुळे लोहटार - खडकदेवळा परिसरात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम होणार आहे.


Social Plugin