* 17 वर्षांच्या सेवेचा गौरव - भारतीय थलसेनेतून नरेंद्र महाजन यांचा सेवापूर्ती व सत्कार सोहळा संपन्न!
नगरदेवळा / प्रतिनिधी :- गावातीलच सुपुत्र आणि भारतीय थलसेनेच्या Crops of Signals Regiment मध्ये गेली 17 वर्षे निस्वार्थ सेवा बजावलेले नरेंद्र सुधाकर महाजन हे भोपाल (मध्य प्रदेश) येथे सेवापूर्ती करून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी नगरदेवळ्यात सेवापूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
* 17 वर्षे मातृभूमीच्या सेवेतील योगदान :- नरेंद्र महाजन यांनी भारतीय थलसेनेत कार्यरत असताना देशाच्या विविध भागात सेवा बजावली. त्यांच्या कामगिरीत शिस्त, प्रामाणिकता आणि देशभक्तीचे तेजस्वी उदाहरण दिसून आले. ते Crops of Signals Regiment मध्ये कार्यरत होते, ज्यांचे कार्य भारताच्या सुरक्षा आणि संचार व्यवस्थेशी थेट संबंधित असते. त्यांच्या समर्पणामुळे गावकऱ्यांच्या तसेच जिल्ह्याच्या पातळीवर अभिमानाची भावना व्यक्त करण्यात आली.
* नगरदेवळा ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव :- या निमित्ताने नगरदेवळा ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमात गावातील मान्यवर नागरिक, युवा वर्ग आणि कुटुंबियांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे वातावरण “भारत माता की जय” आणि “जय जवान, जय किसान” या घोषणांनी भारावून गेले.
* मकसूद खान आणि मेहबूब खान यांच्याकडून विशेष सन्मान :- या कार्यक्रमात नगरदेवळ्याचे रहिवासी आणि सीआरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत मकसूद खान इब्राहिम खान तसेच मेहबूब खान इब्राहिम खान यांनी नरेंद्र महाजन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, नरेंद्र महाजन यांनी देशासाठी अखंड 17 वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या समर्पणातून तरुणांना प्रेरणा घेण्यासारखे उदाहरण मिळाले आहे.
गावकऱ्यांनी मत व्यक्त केले की, नरेंद्र महाजन यांचे योगदान म्हणजे नगरदेवळा गावाचे गौरवपदक आहे. देशासाठी सेवा बजाविणाऱ्या अशा वीर सुपुत्रांचा आम्हाला अभिमान आहे. सेवानिवृत्तीनंतरही नरेंद्र महाजन यांनी सामाजिक आणि राष्ट्रसेवेचा संकल्प कायम ठेवला असून ते म्हणाले की, सेवानिवृत्ती ही देशसेवेचा शेवट नाही, तर समाजसेवेचा नवा अध्याय आहे.


Post a Comment
0 Comments