* उपशिक्षिका व विज्ञान विभाग प्रमुख के.एस. शाह यांना ‘इंडियन टॅलेंट ओलंपियाड एक्सलन्स टीचर अवॉर्ड’
नगरदेवळा / प्रतिनिधी :- एस.के. पवार विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेच्या उपशिक्षिका व विज्ञान विभाग प्रमुख, विद्यार्थीप्रिय शिक्षिका के. एस. शाह मॅडम यांना प्रतिष्ठेचा इंडियन टॅलेंट ओलंपियाड एक्सलन्स टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील असून भारतभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा सोहळा संपन्न झाला.
देशाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व माजी राज्यपाल किरण बेदी, तसेच जागतिक बॅडमिंटन तारा, ऑलिम्पिक पदकविजेती पद्मभूषण सायना नेहवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षिका के. एस. शाह मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कार स्वीकृतीवेळी शाह मॅडम यांनी हा सन्मान संपूर्ण शाळा परिवाराचा आहे. संस्थेचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य व विद्यार्थ्यांचा विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले, असे भावनिक उद्गार काढले.
शाह मॅडम यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या संचालकांनी अभिनंदन केले. त्यात संस्थेचे मानद सचिव बापूसाहेब शिवनारायण जाधव, व्हाईस चेअरमन सुभाष थेपडे, ज्येष्ठ संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेठ, नत्थु पाटील, प्राचार्य किरण काटकर, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर सर, डी. पी. राजपूत सर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शाह मॅडम यांना मिळालेला मान हा विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रेरणादायक आहे. या यशामुळे एस.के. पवार विद्यालय तसेच संपूर्ण परिसरात अभिमानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.


Social Plugin