* माजी विद्यार्थी व गावाचा अभिमान ; सत्कार सोहळ्यात मित्र परिवार, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावातील व सरदार एस. के. पवार विद्यालयाचे माजी विद्यार्थी लक्ष्मण नामदेव महाजन यांची मंत्रालयात (Assistant Section Officer -Class-II) अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावात व शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
यानिमित्त आयोजित अभिनंदन सोहळ्यात माजी उपसरपंच सागर पाटील, विलास राजाराम भामरे ऊर्फ पिंटू भामरे, ग्रामपंचायत सदस्य रवि भाऊ पाटील तसेच सागर पाटील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी लक्ष्मण महाजन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
* गावाचा आणि विद्यालयाचा मान वाढविणारे यश :- लक्ष्मण महाजन हे सरदार एस. के. पवार विद्यालयाचे कर्तृत्ववान माजी विद्यार्थी असून, त्यांच्या यशामुळे संपूर्ण शिक्षण संस्थेचा आणि गावाचा अभिमान वाढला आहे. ग्रामस्थांकडून लक्ष्मण महाजन यांच्या जिद्दीने आणि अभ्यासू वृत्तीने आज त्यांना मंत्रालयातील जबाबदार पद प्राप्त झाले आहे, त्यांच्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येणार असून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
* भावी लक्ष्य Class-I अधिकारी :- सत्कारावेळी उपस्थित मान्यवरांनी लक्ष्मण महाजन यांचे कौतुक करीत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लवकरच Class-I अधिकारी म्हणून नियुक्ती प्राप्त करून गावाचा गौरव वाढवा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
* युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण :- लक्ष्मण महाजन यांच्या यशामुळे गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये शासकीय सेवेसाठी प्रोत्साहन निर्माण झाले आहे. परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर यश शक्य असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.


Social Plugin