* जाब विचारणाऱ्या पतीला आणि सोडविणाऱ्यास मारहाण - पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल
पाचोरा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे पार पडलेल्या यात्रेदरम्यान एका विवाहित महिलेला छेडछाड करून त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात चौघा तरुणांविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि गोंधळ घालण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नगरदेवळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पाचोरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथील 25 वर्षीय विवाहित महिला आपल्या पती, सासू आणि दोन मुलांसह बुधवार, 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या 10 - 11 वाजेच्या सुमारास यात्रेला गेली होती. याच दरम्यान काही तरुणांनी त्या महिलेची छेडछाड केली. या घटनेबाबत महिला आणि तिच्या पतीने जाब विचारला असता, त्या तरुणांनी पतीसह सोडविण्यास आलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी नगरदेवळा येथील लक्ष्मण पाटील, उदय मांडोळे, निलेश मांडोळे आणि ईश्वर महाजन या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 नुसार कलम 74, 76, 78, 118 (1), 351 (2), आणि 3 (5) अन्वये नोंदविण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 0525/2025 असा 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 4 ते 4.30 वाजेदरम्यान नोंद करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक (एसआय) योगेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Post a Comment
0 Comments