Type Here to Get Search Results !

माजी नगरसेवक किशोर पानसरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश

* खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडीत घडली राजकीय चाल - सुधाकर घारे यांची रणनीती ठरली यशस्वी

रायगड / प्रतिनिधी :- कर्जत - खालापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांचे चक्र पुन्हा एकदा फिरले आहे. सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून स्थानिक राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे.

* खोपोलीतील नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश :- कार्यक्रमाच्या प्रारंभी खोपोली शहराचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, तसेच माधुरी तांबे (ठाकरे गट), राम राणे, हरिश्चंद्र राणे, अरुण काळोखे, संजय देशमुख आणि ऋषी राणे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ मिळाले असून पक्षाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.


* खासदार सुनील तटकरे यांचा इशारायुक्त संदेश :- याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित करताना ठामपणे सांगितले की, कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी स्वतः प्रचारासाठी उतरणार आहे. बळाचा गैरवापर करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. त्यांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका झाल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्टपणे जाणवले.


* सुधाकर घारे यांची रणनीती ठरली निर्णायक :- या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे यांच्या संयमी व रणनीतिक नेतृत्वाची पुन्हा एकदा झलक दिसून आली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विविध पक्षांतील असंतुष्ट नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र आले आहेत. कर्जत - खालापूर परिसरात नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी घारे यांच्या डावपेचांतून होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.


राजकीय निरीक्षकांच्या मते, सुधाकर घारे यांच्या संघटनकौशल्यामुळे तालुक्याचे राजकारण नव्या मार्गांवर वळले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या घडामोडींचा थेट परिणाम दिसेल.


* नव्या संघटनात नवा उत्साह :- नवीन सदस्यांना तात्काळ पक्षाच्या स्थानिक संघटनेत जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीची लाट निर्माण झाली आहे. खोपोली आणि कर्जत परिसरात पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क मोहिमेची तयारी सुरू केली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेला हा सुतारवाडीतील राजकीय प्रवेश सोहळा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळवटीकडे एक ठोस पाऊल मानले जात आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement