Type Here to Get Search Results !

“रंग निळा नाद खुळा” वेब सिरीजमध्ये मास्टर श्री यांची मुख्य भूमिकेसाठी निवड

* प्रतिक्षा आर्ट इंटरनॅशनल व KBSF महाराष्ट्र राज्य निर्मित सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नाशिक / फिरोज पिंजारी :- प्रतिक्षा आर्ट इंटरनॅशनल आणि के. बी. एस. एफ. महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होत असलेल्या “रंग निळा नाद खुळा” या आगामी मराठी वेब सिरीजमध्ये मास्टर श्री अर्थात श्री अक्षय सुळ यांची मुख्य बालकलाकार म्हणून निवड झाली आहे. हर्षाली अक्षय सुळ व अक्षय महादु सुळ हे त्यांचे आईवडील आहेत, ही निवड झाल्याने युवा कलाकार मास्टर श्री यांच्याबद्दल मराठी मनोरंजन क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.


या वेब सिरीजचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विक्रम गायकवाड यांनी केली असून, सहनिर्माते दीपक निकम, कार्यकारी निर्माते हेमंत कुमार तर जनसंपर्क प्रमुख मंदा दीपक पवार आहेत. कॅमेरा विभागात विनायक जंगम, अरुण ओहळ आणि जय तारी हे अनुभवी कॅमेरामन कार्यरत आहेत.


सध्या या प्रकल्पासंदर्भात अंतिम चर्चासत्र सुरू असून, सिरीज लवकरच विविध डिजिटल प्लॅटफॉर्मसह डिजे चॅनेल (DJ Channel) वर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच प्रतिक्षा इंटरनॅशनलच्या यूट्यूब चॅनलवरही ही वेब सिरीज रिलीज होणार आहे.


मास्टर श्री यांच्या निवडीमुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या आईवडील हर्षदा सुळ व अक्षय सुळ तसेच संपूर्ण नातेवाईकांनी या यशाचा आनंद व्यक्त केला आहे. या वेब सिरीजमधून मास्टर श्री यांचा नाजूक, निरागस आणि प्रेमळ चेहरा प्रेक्षकांना भावेल असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.


विक्रम गायकवाड यांनी यापूर्वीही पाऊले चालती तुळजापुरची वाट, उपासमार, अंतरवेली तू आणि मी, अनाडी बायको खिलाडी...अशा विविध मराठी - हिंदी चित्रपटांमध्ये दिग्दर्शनाची यशस्वी भूमिका बजावली आहे. तसेच दूरदर्शनवरील चकवा मालिकेद्वारेही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. या वेब सिरीजमध्ये आफताब अय्यूब पिंजारी (नगरदेवळा) हे सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत.



Top Post Ad

Below Post Ad

Advertisement