Type Here to Get Search Results !

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन पंचनामे करुन सरसकट भरपाई द्या!

* शिवसेना शिंदे गटातर्फे मुरुड तहसीलदारांना निवेदन 

मुरूड / राजीव नेवासेकर :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चार पाच दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटात पडलेल्या अतिवृष्टीमुळे मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातपीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन पंचनामे करुन सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे रायगड जिल्हा उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख निलेश घाटवळ, बांधकाम कामगार सेना अध्यक्ष दिनेश मिणमिणे,जिल्हा युवासेना प्रमुख दिपेश वरणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांना एक निवेदन देण्यात येऊन करण्यात आली आहे.

  

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपीकांचे भिजून, वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    

अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार आपल्या तालुक्यातील सर्व शेतीचे अतितातडीने पंचनामे करून लवकरात लवकर सरसकट नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा करावी, असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  

शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, उपजिल्हा युवासेना प्रमुख दिपेश वरणकर, तालुका प्रमुख निलेश घाटवळ, बांधकाम कामगार सेना अध्यक्ष दिनेश मिणमिणे, युवानेते विघ्नेश माळी, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर, शरद खेडेकर, निलेश तांबडकर, राजन नाक्ती, स्वप्नील चव्हाण, अविनाश शिंदे, माजित हुसेनी, विशाल पाटील, अरविंद शेडगे, माजी सरपंच संतोष पाटील (शिघ्रे), दानेश डावरे, फिरोज खान, जितेंद्र दिवेकर, दिपेश पाटील, सुहेल किल्लेकर, शेतकरी मंगेश पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement