Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत हर्षल पालवेचा चमकदार विजय!

* सदाशिवनगर केंद्र शाळेचा विद्यार्थी ठरला ‘बेस्ट स्पीकर’

* वक्तृत्वात प्रथम, कथाकथनात तृतीय क्रमांक पटकावला

माळशिरस / अनिल पवार :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत सदाशिवनगर केंद्र शाळेचा गुणी विद्यार्थी हर्षल शहाजी पालवे याने उत्तुंग कामगिरी करून आपल्या शाळेचा मान उंचावला आहे. हर्षलने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच कथाकथन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून तालुकास्तरावर आपली प्रभावी छाप पाडली आहे.

* हर्षलच्या यशाचा शाळेत जल्लोष :- हर्षलच्या या उल्लेखनीय यशानंतर शाळेमध्ये गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच विष्णू भोंगळे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव, माजी उपसरपंच उदय धाईजे, राजेंद्र जाधव तसेच गावातील पालक, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात हर्षलचा रोख रक्कम देऊन व पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर हर्षलच्या आई-वडिलांचा, आजोबांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक व शिक्षकांच्या योगदानाचाही गौरव केला.


* स्पर्धा म्हणजे विकासाचा पाया :- समारंभात बोलतांना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, भाषणकौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यावश्यक आहे. हर्षलने यश मिळवून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.


* अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव :- हर्षलच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शिक्षकांनी हर्षलच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले.


* शाळेत आनंदाचे वातावरण :- सदाशिवनगर केंद्र शाळेत हर्षलच्या यशामुळे आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह आहे. हर्षल पुढील जिल्हास्तरावरही अशीच चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement