* नगरसेवक संकेत भासे यांच्या प्रयत्नांना गती, आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग उभारणीचे काम वेगाने
* रस्ता, गटार, पाईपलाईन, प्रकाशयोजना व मूलभूत सुविधांच्या उभारणीला चालना
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत नगर परिषद हद्दीतील संजय नगर व छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात मागील कालावधीत विविध सार्वजनिक विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आली असून, यामध्ये रस्ते, गटारे, पाईपलाईन, प्रकाशयोजना तसेच सोयीसुविधांच्या निर्मितीचा समावेश आहे. ही सर्व कामे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक ॲंड. संकेत जनार्दन भासे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण करण्यात आली आहेत.
* संजयनगर विभागातील पूर्ण झालेली प्रमुख विकासकामे :- संजय नगर - छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील ब्रिज बांधकाम, मयुर दाभणे ते सचिन देशमुख घरापर्यंत रस्ता व गटारनिर्मिती, तातेर रेसिडेन्सी ते नंदनवन गिरीवन सोसायटी पाईपलाईन टाकणे, पेट्रोल पंप ते ललानी रोड डांबरीकरण व बंदिस्त गटार बांधकाम, संजय नगर चौक - शिवाजी महाराज ब्रिजपर्यंत गटारनिर्मिती, एस.व्ही.एस. बिल्डिंग ते अजय सुवर्णे घरापर्यंत डांबरीकरण, संजय नगर चौक ते विनायक गायकवाड निवासस्थानापर्यंत पेवर ब्लॉक बसविणे, संजय नगर चौकात हायमास्क टॉवर बसविणे व स्ट्रीट लाईटची उभारणी, फूड कोर्ट - हॉंटेल ते पाण्याची टाकीपर्यंत डांबरीकरण, कोकण ज्ञानपीठ कॉलेज परिसरातील काँक्रीट रस्ता तयार करणे, वृंदावन पार्क ते तातेर रेसिडेन्सीपर्यंत काँक्रीट रस्ता बांधकाम यासह रस्ता, शौचालय, स्ट्रीट लाईट व आरोग्याची अनेक कामे नगरसेवक ॲंड. भासे यांच्याकडून करण्यात आली आहेत.
* परिसरातील नागरिकांना मिळणारे लाभ :- परिसरातील नागरीकांसाठी वाहतुकीची सुविधा सुधारली, निचरा आणि स्वच्छतेची समस्या कमी, प्रकाशयोजनामुळे सुरक्षा वाढली, पाण्यासाठीची पाईपलाईन सुधारणा, शैक्षणिक व निवासी भागात सुधारित रस्तेमार्ग ही सर्व कामे नागरी मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण आणि परिसर रहिवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन करण्यात आल्याचे कळते.


Post a Comment
0 Comments