Type Here to Get Search Results !

भूमी किसान जनता पार्टीच्या सांस्कृतिक मोर्चात नवी दमदार नियुक्ती

* हेमंत कुमार कुलकर्णी यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड

* राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या आदेशानुसार जबाबदारी 

* राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय 

नाशिक / फिरोज पिंजारी :- भूमी किसान जनता पार्टीच्या सांस्कृतिक मोर्चात महाराष्ट्रातून कार्यरत सामाजिक आणि संघटनशील व्यक्तिमत्व हेमंत कुमार कुलकर्णी यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम यांच्या आदेशाने आणि मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


* कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर घोषणा :- नियुक्तीचा कार्यक्रम महाराष्ट्र अध्यक्ष दिपक निकम, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर तसेच पेंढारकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हेमंत कुमार कुलकर्णी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी सांगितले की, कुलकर्णी यांनी किसान, कामगार आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे भूमी किसान जनता पार्टीचा सांस्कृतिक मोर्चा आणखी बळकट होईल.


* शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व :- हेमंत कुमार कुलकर्णी यांनी नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर शेतकरी वर्गाच्या हक्कांसाठी, कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि संस्कृती संवर्धनासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांनी नाशिक चित्रपट नगरी प्रकल्पासाठी पुढाकार घेत अनेक ठिकाणी चर्चा घडवून आणल्या. शेतकरी, कामगार आणि कलाकार हेच देशाचे खरं सामर्थ्य आहे. त्यांच्या प्रश्नांना राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे, असे कुलकर्णी यांनी निवडीनंतर सांगितले.


* नाशिक जिल्हा पातळीवरील नवी संघटनात्मक मोहीम :- पक्षात लवकरच नाशिक जिल्हा पातळीवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नाशिक जिल्हा निरीक्षकपदीही हेमंत कुलकर्णी यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या सोबत सुनंदा मांडगे, प्रमिला चव्हाण आणि मोहन सौदागर हे जिल्हा पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील.


राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदा पवार यांनी सांगितले की, कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नाशिक विभागातील संघटन अधिक मजबूत होईल. महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे.


* भाजप समर्थक म्हणून भूमी किसान जनता पार्टीचा निर्धार :- भूमी किसान जनता पार्टीने जाहीर केले आहे की, आगामी निवडणुकांमध्ये पक्ष भारतीय जनता पक्षाला (BJP) समर्थन देणार आहे. ज्या ठिकाणी उमेदवार उभे राहतील, तिथे प्रचारार्थ सभा आयोजित करून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा निर्धार राष्ट्रीय नेतृत्वाने केला आहे. लवकरच पक्षाचे प्रतिनिधी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आगामी निवडणुकांबाबत अधिकृत पाठिंबा जाहीर करणार आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement