* प्रतीक्षा आर्ट्स आणि केबीएसएस ग्रुप महाराष्ट्रचा उपक्रम
* सहाय्यक दिग्दर्शक आफताब अयुब पिंजारी, निर्माता दीपक निकम
* अभिनेत्री प्रमिला चव्हाण आणि मोहन सौदागर प्रमुख भूमिकेत
नाशिक / फिरोज पिंजारी :- मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी उत्साहवर्धक बातमी आहे. प्रतीक्षा आर्ट इंटरनॅशनल प्रोडक्शन हाऊस आणि केबीएसएस ग्रुप महाराष्ट्रच्या माध्यमातून "रंग निळा नाद खुळा" ही मराठी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासह "सुरक्षारक्षक" हा लघुपटही निर्मितीच्या मार्गांवर आहे.
या प्रकल्पात आफताब पिंजारी यांना सह दिग्दर्शक म्हणून संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना नामांकित निर्माता - दिग्दर्शक विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दरम्यान, निर्माते दीपक निकम अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोबत अभिनेत्री प्रमिला चव्हाण व अभिनेता मोहन सौदागर आहेत. मुंबई आणि नाशिक येथील अनेक कलाकार या वेब सिरीजमध्ये झळकणार असून कथानक प्रेक्षकांना नवी अनुभव यात्रा देणारे आहे, अशी माहिती लेखक, निर्माते विक्रम गायकवाड यांनी दिली.
* कलाकार आणि टीम :-
प्रमुख निर्माते - दीपक निकम
मुख्य अभिनेत्री - प्रमिला चव्हाण
पार्श्वभूमी अभिनेता - मोहन सौदागर
कार्यकारी निर्माता - हेमंत कुमार कुलकर्णी
जनसंपर्क प्रतिनिधी - मंदा पवार
निर्माता, दिग्दर्शक - विक्रम गायकवाड
सहाय्यक दिग्दर्शक - आफताब अयुब पिंजारी
बाल कलाकार - मास्टर श्री सुळ
* मुहूर्त लवकरच :- या दोन्ही प्रकल्पांच्या शूटिंगचा शुभमुहूर्त येत्या रविवारी देवळाली कॅम्प रोडवरील रेणुका माता मंदिरात पार पडणार आहे. या उपक्रमासाठी शिवाजी बोर्डे भालेराव सर यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
* काय म्हणाले टीम सदस्य ? :- प्रकल्पाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतांना निर्माता दीपक निकम म्हणाले की, मराठी प्रेक्षकांसाठी दर्जेदार कंटेंट आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कथा आणि कलाकारांची निवड अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे.
सहाय्यक दिग्दर्शक आफताब पिंजारी यांनी सांगितले की, ही संधी माझ्यासाठी मोठा टप्पा आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडेल असे सादरीकरण करण्यासाठी संपूर्ण टीम प्रेरित आहे.
* लवकरच OTT वर प्रदर्शित होणार :- या सिरीजचे शूट संपताच लवकरच ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची घोषणा होणार आहे. चाहत्यांमध्ये या नव्या प्रकल्पाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.


Social Plugin