* कविता शरद पेंढारकर यांची श्रीलंकेत “अवॉर्ड 2025” साठी निवड
* नाशिक जिल्हा संघटक म्हणून सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान
* गोरगरिब महिलांसाठी सातत्याने लढा - कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय सन्मानाचा मान
नाशिक / फिरोज पिंजारी :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून गोरगरिब, गरजू आणि महिलांच्या हक्कासाठी सातत्याने झटणाऱ्या कविता शरद पेंढारकर यांची “अवॉर्ड 2025 ” (International Women Achievement Award) साठी निवड झाली आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रदान केला जाणार असून, या सन्मानामुळे नाशिक जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे.
* इंडियन पोलिस मित्र संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे नेतृत्व :- कविता पेंढारकर या इंडियन पोलिस मित्र संस्था या सामाजिक संस्थेत नाशिक जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत. संस्थापक अध्यक्ष गिरीश जी आणि जिल्हाध्यक्ष हेमंतकुमार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यातून पोलिस मित्र संस्थेच्या सामाजिक कार्याला नवा ऊर्जावान चेहरा मिळाला आहे. त्यांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून महिलांना न्याय, सुरक्षा आणि स्वावलंबन मिळवून देण्यासाठी लढा दिला आहे.
* गोरगरीब महिलांसाठी समर्पित लढा :- कविता पेंढारकर यांनी गरीब आणि असहाय महिलांना आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक संकटग्रस्त महिलांना त्यांनी स्वंरोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणले आहे. त्यांच्या कामामुळे शेकडो कुटुंबांना नव्या आयुष्याचा आधार मिळाला आहे.
* कार्याची आंतरराष्ट्रीय दखल :- इंडियन पोलिस मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश जी यांनी सांगितले की, कविता मॅडम यांचे कार्य हे सेवाभावी वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
संस्थेचे जिल्हाध्यक्ष हेमंतकुमार कुलकर्णी यांनी देखील त्यांचे अभिनंदन करीत म्हटले की, कविता पेंढारकर मॅडम यांचा सामाजिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
* श्रीलंकेच्या प्रवासाची तयारी :- कविता पेंढारकर यांना या पुरस्काराबद्दल अत्यंत आनंद झाला असून, त्या लवकरच श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या या प्रवासासाठी जिल्ह्यातील नागरिक, महिला गट आणि पोलिस मित्र संस्था परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हा सन्मान माझा नसून, तो सर्व त्या महिलांचा आहे ज्या आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा या सन्मानामुळे आणखी वाढली आहे, असे कविता पेंढारकर यांनी नमूद केले.


Post a Comment
0 Comments