Type Here to Get Search Results !

प्रभाग 13 मध्ये मुमताज मंसुरींच्या विकासाचा बिगुल

* उमेदवार मी नव्हे… तुम्ही सर्वच - महिलांच्या सक्षमीकरणाचा, नव्या खोपोलीचा दृढ संकल्प

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 चा ताप वाढू लागला आहे आणि यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांमधून विकासाची नव्या पर्वाची चाहूल लागली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून आम आदमी पक्षाच्या मुमताज अल्ताफ मंसुरी यांनी दमदार पद्धतीने उमेदवारी जाहीर करीत “मी सज्ज आहे, खोपोलीत विकासाची गंगा आणायला” असा गगनभेदी नारा देत महिलांच्या सशक्त नेतृत्वाची ठाम घोषणा केली आहे.


* उमेदवार मी नाही… तुम्ही सर्व आहात :- आपल्या जाहीरनाम्यात मुमताज मंसुरी म्हणतात की, या…माझी साथ द्या. गावाचा विकास साधू या. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे. उमेदवार मी नव्हे, तुम्ही सर्वच आहात...जनतेशी भावनिक नाते जोडणारा हा संदेश प्रभाग 13 मध्ये मोठ्या प्रमाणावर पोहोचला आहे.


* विकास, शिक्षण आणि महिलांच्या प्रगतीवर ठोस भर :- प्रभाग क्रमांक 13 मध्ये पाणीपुरवठा अनियमितता, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्यसेवेची कमतरता, महिला सक्षमीकरणाचे अभाव, युवकांसाठी रोजगाराच्या संधी कमी यांसारख्या तातडीच्या समस्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करीत मुमताज मंसुरी यांनी वचन दिले आहे की, प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवू, प्रत्येक मुलीला शिक्षण, सुरक्षा व संधी उपलब्ध करून देऊ, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम राबवू, युवा पिढीसाठी रोजगार आणि करिअर मार्गदर्शनाची सोय करू


* धनशक्तीचा महापूर मतदारांनी ओळखावा :- सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ जावेद मंसुरी यांनी स्पष्ट शब्दांत मतदारांना इशारा दिला आहे की, मागील 7 - 8 दिवसांत काही पक्षांनी पैसे वाटून मतदारांना लुभवण्याचा प्रयत्न केला. लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करणारे खरंच विकास करणार का ? 5 रुपयांच्या वस्तूवर दुप्पट नफा कमावणारा व्यापारी जेव्हा निवडणुकीत लाखो उधळतो, तेव्हा तो पैसा परत वसूल होईलच…मग विकास कुठून होणार ? त्यांनी मतदारांना विचार करण्याचे आवाहन केले आहे. पैशाच्या जोरावर सत्ता मिळवणारे प्रभागाचा विकास नाही करू शकत. बदल हवा असेल तर स्वच्छ पर्यायाची निवड करा, असे आवाहन अल्ताफ मंसुरी यांनी केले आहे.


* प्रभाग 13 मध्ये नवनेतृत्वाचा उदय :- प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम आदमी पक्षाने स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिक कामाचा ध्यास यांवर भर दिला आहे. अल्ताफ मंसुरी म्हणाले की, प्रभाग 13 मध्ये मुमताज मंसुरींचा ‘झाडू’ विरोधकांचा सुफडासाफ करेल. एकदा संधी द्या आणि आम आदमी पार्टी शहराचा आणि प्रभागाचा विकास करून दाखवेल.


* जनतेच्या आशीर्वादाने नव्या खोपोलीचे स्वप्न :- मुमताज मंसुरींचा संदेश स्पष्ट आहे की, माझ्या मागे उभे राहा…मी तुमच्या घरातील मुलगी आहे. खोपोलीत विकासाची गंगा आणण्यासाठी तुमच्या एका मताची ताकद पुरेशी आहे. प्रभाग 13 मध्ये नव्या नेतृत्वाचा उदय आणि बदलाची इच्छाशक्ती स्पष्ट दिसत आहे. आता मतदार या नव्या आशेच्या प्रतीकाला कितपत साथ देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement