Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथील मुन्नाफ पिंजारी यांचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चात प्रवेश

* राष्ट्रीय सूफी संवाद अभियानाच्या सह प्रभार्‍यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश ; संघटना बळकटीसाठी युवकांचा पुढाकार

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील मुन्नाफ नजीर पिंजारी यांनी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय सूफी संवाद अभियानाचे सहप्रभारी आबिद अली चौधरी यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.


* मुन्नाफ पिंजारी यांच्यासह युवकांचाही भाजपात प्रवेश :- मुन्नाफ पिंजारी यांच्यासोबत मुस्ताक पिंजारी आणि गणेश (पाचोरा) यांनीही भाजपाचे सदस्यत्व स्विकारले. या तिघांनीह भाजपच्या विकासधोरणांवर विश्वास ठेवून संघटना मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.


* भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती :- या कार्यक्रमाला अरबाज अफजल खान (अंबरनाथ पश्चिम, पॅनल क्रमांक 9, उत्साही भाजप पदाधिकारी), भारत बठीजा (महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा), प्रदीप गोपलानी, (ज्येष्ठ भाजप पदाधिकारी), वसंत धुमाळ, मठाधीपति योगी धनराजनाथजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, समर्थक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* अल्पसंख्याक समाजाचा विश्वास वृद्धिंगत :- मुन्नाफ पिंजारी यांचा भाजपा प्रवेश हा अल्पसंख्याक समाजात भाजपाबद्दल वाढत असलेल्या विश्वासाचा आणि संघटनेचा सातत्याने वाढणारा प्रभावाचा द्योतक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे नगरदेवळा आणि पाचोरा परिसरातील अल्पसंख्याक मोर्च्याच्या संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement