* शिवकालीन संस्कृती, परंपरा आणि सामाजिक उपक्रमांतून लौकिक संपादन केलेल्या प्रतिष्ठानचा भव्य सोहळा ; मान्यवरांच्या उपस्थितीने उजळणार कार्यक्रम
खालापुर - कर्जत / प्रतिनिधी :- रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि.) हे शिवकालीन वैभव, मराठी संस्कृती आणि परंपरेचा अभिमान जपत सामाजिक बांधिलकी जपणारे एक सक्रिय आणि उल्लेखनीय कार्यरत संगठन आहे. समाज विकासासाठी विविध उपक्रम राबवून प्रतिष्ठानने अनेक क्षेत्रांत प्रशंसनीय बदल घडविले असून, त्यामुळे संस्थेला समाजात भक्कम असा लौकिक प्राप्त झाला आहे.
या सामाजिक योगदानाची परंपरा पुढे चालवत रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी, प्रतिष्ठानतर्फे भव्य दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत लोकमान्य इंग्लिश स्कूल आणि कॉलेज, विजय नगर, विरार रोड, इन्फंट स्कूल समोर, नालासोपारा (पूर्व), वसई-पालघर येथे उत्साहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आपली उपस्थिती आम्हाला अधिक प्रेरणा देणारी ठरेल, असे आवाहन रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांना या सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Social Plugin