Type Here to Get Search Results !

युवा नेते व पत्रकार कै. योगेश सुभाष महाजन यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

* नगरदेवळा परिसरातील समाजकारण, पत्रकारिता व राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने मोठी पोकळी - विविध संस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा परिसरातील ओळखणारे युवा नेते, समाजकारणी व पत्रकार कै. योगेश सुभाष महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. देवाज्ञा 3 डिसेंबर 2025, बुधवार रोजी झाली. त्यांच्या निधनाने नगरदेवळा तसेच पाचोरा परिसरात शोककळा पसरली आहे.

योगेश महाजन हे परिसरातील युवा नेते म्हणून अत्यंत लोकप्रिय होते. माजी आमदार दिलीप वाघ यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. राजकीय, सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर ते नेहमी नेतृत्व करीत असत. समाजकारण, पत्रकारिता आणि जनसेवा या तिन्ही क्षेत्रांतून त्यांनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.


त्यांच्या जाण्याने नगरदेवळा परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचा उत्साह, लोकांसाठीची धडपड आणि समाजासाठीचे समर्पित कार्य यांची उणीव कायम भासणार आहे, अशी भावना त्यांच्या अनुयायांनी व्यक्त केली.


कै. योगेश महाजन यांना दै. कोकण प्रदेश न्यूज, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, दिलीप भाऊ युवा फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी (पाचोरा), नगरदेवळा परिसर पत्रकार संघटना, शिवकन्या बहुउद्देशीय संस्था, श्रत्रिय फुलमाळी समाज नगरदेवळा ग्रामस्थ आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्वांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement