Type Here to Get Search Results !

वै. ह. भ. प. भाऊ महाराज पाटील उंब्रेकरांच्या 60 व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर आणि जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

* धाकटी पंढरी - साजगाव येथे 6 व 7 डिसेंबरला दिव्य सोहळा ; 50 हून अधिक भजनी मंडळांची नोंदणी

खालापूर / प्रतिनिधी :- ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि गुरूवर्य ह. भ. प. तानाजी महाराज कर्णूक यांच्या मार्गदर्शनाखाली, वैकुंठवासी ह. भ. प. भाऊ महाराज पाटील उंब्रेकर यांच्या 60 व्या पुण्यस्मरणानिमित्त धाकटी पंढरी साजगाव येथे 6 व 7 डिसेंबर 2025 रोजी भव्य महाआरोग्य शिबिर व रायगड जिल्हास्तरीय तसेच स्थानिक भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय तसेच भक्तजनांमध्ये उत्सुकता आणि श्रद्धेचे वातावरण पसरले आहे.


भजन स्पर्धेसाठी आतापर्यंत 50 हून अधिक भजनी मंडळांनी ऑनलाईन नोंदणी केली असून मोठ्या भक्तांच्या उपस्थितीत स्पर्धा रंगणार आहे. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक ₹21,000 + सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ₹15,000 + सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक  ₹ 11,000 + सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक ₹ 7,000 + सन्मानचिन्ह, पाचवे क्रमांक ₹ 5,000 + सन्मानचिन्ह अशी भजन स्पर्धेची बक्षिसे आहेत.


प्रथम 10,000 + सन्मानचिन्ह, द्वितीय  ₹ 7,000 + सन्मानचिन्ह, तृतीय  ₹ 5,000 + सन्मानचिन्ह, चतुर्थ 3,000 + सन्मानचिन्ह, पाचवे ₹ 2,000 + सन्मानचिन्ह अशी स्थानिक भजन स्पर्धेची बक्षिसे होती.


उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट तबला वादन, उत्कृष्ट पखवाज वादन, उत्कृष्ट टाळ वादन असे विशेष कौशल्य पुरस्कार (प्रत्येकी ₹ 1000 + सन्मानचिन्ह) 


या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील वारकरी परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकार, भजनी गायक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, विविध आरोग्य तपासण्या, औषध वितरण आदी सुविधा मोफत उपलब्ध राहणार आहेत.


या भव्य सोहळ्याचे प्रमुख आयोजक ह. भ. प. भगवान बाळकृष्ण पाटील यांनी सांगितले की, भाऊ महाराज उंब्रेकर यांच्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा भक्तांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरेल. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यस्मरण सोहळ्याची शोभा वाढवावी.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement