पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नगरदेवळा आऊट पोस्टचे कर्तव्यदक्ष हवालदार हरीश अहिरे यांना सहाय्यक पोलीस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. गुरुवारी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात ही पदोन्नती औपचारिकरित्या जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार तसेच उप पोलीस निरीक्षक योगेश गणगे यांच्या हस्ते अहिरे यांना सहाय्यक पोलीस हवालदार पदाची फित लावण्यात आली. कार्यक्रमाला सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व हवालदार उपस्थित होते.
कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि जनसेवेसाठी तत्पर अशा हरीश अहिरे यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत ही पदोन्नती देण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्या या पदोन्नतीमुळे नगरदेवळा आऊट पोस्ट तसेच पाचोरा पोलीस विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पदोन्नतीबद्दल बोलताना अधिकारी व सहकाऱ्यांनी अहिरे यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Social Plugin