Type Here to Get Search Results !

इस्त्राईलमध्ये नूतनीकरण बांधकाम क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी

* रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी परदेशी रोजगाराची सुवर्णसंधी - सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार

रायगड / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्त्राईलमधील नूतनीकरण (Renovation) बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार यांनी दिली आहे.

इस्त्राईलमधील अंतर्गत नूतनीकरण, जुन्या इमारतींच्या दुरुस्ती, संरक्षण व उन्नतीकरण कामांसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी भारतीय कामगारांची मोठी मागणी असून, त्याअंतर्गत विविध बांधकाम कौशल्यांसाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

* उपलब्ध पदे व जागा :-

प्लॅस्टरिंग कामगार - 1,000 जागा

सिरेमिक टाईल्स लावणी कामगार - 1,000 जागा

ड्रायवॉल कामगार - 300 जागा

मेसन (गवंडी) - 300 जागा

* शैक्षणिक व इतर पात्रता :-

किमान दहावी उत्तीर्ण

संबंधित कामात किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

इंग्रजी वाचन, लेखन व संभाषणाचे मूलभूत ज्ञान आवश्यक

आंतरिक नूतनीकरण कामातील प्राविण्य

जुन्या इमारतींच्या दुरुस्ती व संरक्षक कामाचा अनुभव

* वयोमर्यादा : 25 ते 50 वर्षे

* मानधन व कामाच्या अटी :-

अंदाजे पगार : ₹1,62,500/- प्रतिमहिना

कामाचे तास : महिन्याला 182 तास

कामाचे दिवस : महिन्याला 21 ते 26 दिवस (कंपनीनुसार)

निवास व्यवस्था : नियोक्त्याकडून उपलब्ध

अन्नाची व्यवस्था : उमेदवाराने स्वतः करायची

वैद्यकीय विमा : नियोक्त्याकडून

ओव्हरटाईम : कंपनीच्या नियमांनुसार

* करार व व्हिसा तपशील :-

पहिला व्हिसा वर्षाअखेरपर्यंत वैध

त्यानंतर दरवर्षी नूतनीकरणाची संधी

कमाल करार कालावधी : 63 महिने

कामाचे ठिकाण : संपूर्ण इस्त्राईल

* इतर आवश्यक अटी :-

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) अनिवार्य

व्हिसासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी उमेदवाराने स्वतः करून घ्यायची

मुलाखत पद्धत : प्रत्यक्ष (समोरासमोर)

सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार यांनी पात्र व इच्छुक युवक-युवतींना आवाहन केले आहे की, फसवणुकीपासून दूर राहून केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारेच अर्ज करावेत.

अधिक माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी :

👉 https://maharashtrainternational.com

ही संधी रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी परदेशात उच्च पगाराचे रोजगार मिळविण्याची एक महत्त्वाची व भरोसेमंद सुवर्णसंधी ठरणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement