Type Here to Get Search Results !

उंच मानेने जगायचे असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय

* सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

नगरदेवळा / प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे 6 डिसेंबर 2025, शनिवार रोजी विविध शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सादीक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आपल्या जीवनात स्विकार केला तरच खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध होईल. शिक्षण हा उंच मानेने जगण्यासाठीचा एकमेव आणि प्रभावी मार्ग आहे, असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील पर्यवेक्षिका मनीषा जाधव मॅडम यांनी भूषविले. तर शाळेतील उपक्रमशील शिक्षक, स्काऊट-गाईड विभाग प्रमुख जी. यू. पवार सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली.


या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून सादीक शेख सर यांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. तसेच पी. आर. तायडे सर व इकबाल शेख सर यांनी कविता व गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. शाळेतील मराठी व उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. याप्रसंगी तायडे सर लिखित व अमोल सर संगीतबद्ध केलेले गीत विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले, ज्यास उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. समाधान ठाकूर सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर राकेश सोनवणे सर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भाषण व गीत सादरीकरणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा कार्यक्रम ठरला.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement