Type Here to Get Search Results !

प्राचार्य किरण काटकर यांना ‘शिलेदार सन्मान पुरस्कार’

* लोकमत परिवारातर्फे जिल्ह्यातील उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के. एन. काटकर यांना लोकमत परिवार यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात  ‘शिलेदार सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान समारंभ 6 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.


या गौरव सोहळ्यास आमदार राजुमामा भोळे, माजी खासदार डॉं. उल्हास पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, रोहित निकम, अनुप अग्रवाल, रस्तोगी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


लोकमत परिवाराच्या वतीने जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यामध्ये नगरदेवळा नगरीचे सुपुत्र, विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य के. एन. काटकर तसेच त्यांच्या सौभाग्यवती व नगरदेवळा नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच प्रतीक्षा किरण काटकर यांचा सन्मान करण्यात आला.


शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढ, सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील योगदान अशा बहुआयामी कार्याची दखल घेत लोकमत परिवाराने काटकर सरांना ‘शिलेदार सन्मान पुरस्काराने’ सन्मानित केले, असे आयोजकांनी नमूद केले. काटकर सरांनी आपल्या कार्यकाळात शाळेचा सर्वांगीण विकास साधून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण केले आहे.


या सन्मानाबद्दल ग्राम शिक्षण समितीचे व्हा. चेअरमन सुभाष थेपडे, मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, नथू पाटील व अब्दुल गनी शेठ यांनी काटकर सरांचे मनापासून अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल सर, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर सर, डी. पी. राजपूत सर व सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या वतीनेही काटकर सरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


हा सन्मान नगरदेवळा गावासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला असून, काटकर सरांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा क्षण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement