Type Here to Get Search Results !

सैलानी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मेहकरजवळ भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू, 16 जखमी

* लातूरहून बुलढाण्याकडे जात असताना वाहन उलटले

* जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले, काहींना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर

बुलढाणा / प्रतिनिधी :- लातूर जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी सैलानी येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा मेहकरजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथून भाविकांचा समूह सैलानी येथे दर्शनासाठी निघाला होता. मेहकर परिसरात येताच वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. अपघात इतका भीषण होता की, दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करीत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.


अपघाताची माहिती मिळताच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना योग्य उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.


या अपघातामुळे भाविकांमध्ये तसेच स्थानिक परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement