Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात उद्या भव्य रक्तदान शिबिर

* महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचा पुढाकार

पाचोरा / फिरोज पिंजारी :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) आणि अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 30 मार्च 2026 रोजी पाचोरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा आणि रुग्णसेवेचा वसा जोपासला जावा, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची ही सकारात्मक परंपरा असल्याचे आयोजकांनी सांगितले. पाचोरा येथील व्यापारी भवन (कृषी उत्पन्न बाजार समिती समोर) येथे सकाळी 8.30 ते 11.30 या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे.


या उपक्रमात किशोर रायसाकडा मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


* नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन :- 'रक्तदान हेच जीवनदान’ या संदेशातून पाचोरा परिसरातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement