Type Here to Get Search Results !

खालापूर नगर पंचायतीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

* रांगोळी, पाककला, पोस्टर स्पर्धांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

* स्त्रीने स्त्रीसाठी प्रेरणादायी भूमिका निभवावी - मुख्याधिकारी कोमल कराळे

खालापूर / सुधीर माने :- खालापूर नगरपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील महिलांसाठी विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात 17 मार्च 2026 रोजी रांगोळी स्पर्धेने झाली. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेत आकर्षक आणि कलात्मक रांगोळ्या साकारल्या. यानंतर 18 मार्च 2026 रोजी मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब, माता रमाई आणि क्रांतिकारक शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. 


या कार्यक्रमाला खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, मुख्याधिकारी कोमल कराळे, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, बांधकाम सभापती मिनल कबले, उपसभापती मीना वाघमारे तसेच नगरसेविका उज्वला निधी, लता लोते, सुनिता पाटील, डॉं. जाधव, डॉं. इंगोले मॅडम, विनिता आठवले, क्षमा आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, “स्त्रीने स्त्रीची अडचण न बनता तिच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.” त्यानंतर विनिता आठवले यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शिवानी जंगम, डॉं. इंगोले आणि इतर मान्यवरांनीही महिलांना प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.


* स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :- 

🔸 रांगोळी स्पर्धा :-

१) रोशनी निधी

२) कांचन पवार

३) लता पाटील

🔸 पाककला स्पर्धा :-

१) सुरेखा मोरे

२) आशा भानुशाली

३) नमिता चौधरी

🔸 संगीत खुर्ची :-

१) रेखा गायकवाड

२) कल्याणी गायकवाड

🔸 लकी ड्रॉ :-

१) गौतमी पवार

🔸 पोस्टर स्पर्धा (जी.जे.एम हायस्कूल) :-

प्रथम - काव्या खंडागळे

द्वितीय - रुद्र चव्हाण

तृतीय - श्रुती भालेराव

🔸 पोस्टर स्पर्धा (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, खालापूर) :-

प्रथम - कार्तिकी दिसले

द्वितीय - दिव्या फराट

तृतीय - आर्या गोळे

या कार्यक्रमात परिसरातील अनेक सक्षम महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेवटी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


खालापूर नगरपंचायतीच्या या उपक्रमातून महिलांना प्रोत्साहन देत त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून समाजात महिलांच्या सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश पोहोचला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement