* हक्क आणि कायदेविषयी सविस्तर मार्गदर्शन
* नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत 70 महिलांचा सहभाग
* तज्ज्ञांकडून अधिकार, कायदे आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन
कर्जत / प्रतिनिधी :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) रायगड अंतर्गत प्रगती लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) कर्जत यांच्या वतीने नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत ‘कायदासाथी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी करण्यात आले. या प्रशिक्षणात स्वयंसहाय्यता बचत गटातील सुमारे 70 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती CMRCच्या व्यवस्थापक पद्मावती गायकवाड यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्ष डॉं. हेमलता चिंबुळकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी तालुका विधी सेवा समिती, कर्जत येथील लिपिक योगेंद्र यनम, पॅनलवरील ॲंड. भारती ढाकवळ व ॲंड. प्रमिला चव्हाण यांनी महिलांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले. महिलांचे हक्क, अन्यायाविरोधातील विविध कायदे, तसेच त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी माविम रायगडचे AMO प्रसाद पिंपरकर तसेच महिला व बाल संरक्षण अधिकारी प्रमोद वाघ यांनीही महिलांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी कायदेविषयक माहिती आत्मसात करून आपल्या हक्कांविषयी जागरूकता वाढवली. अशा प्रकारचे प्रशिक्षण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. कार्यक्रमाला प्रगती CMRCच्या अध्यक्षा डॉं. हेमलता चिंबुळकर, सचिव सविता मोरे, सदस्य तुपे ताई, गायकवाड ताई, पूजा कालेकर तसेच इतर संचालक मंडळ उपस्थित होते.
हे प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्यासाठी माविम रायगडचे जिल्हा समन्वय अधिकारी विजय सर, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी वंदना मॅडम, लेखाधिकारी योगिनी मॅडम तसेच CMRC लेखापाल अंकीता बडेकर, सहयोगिनी मंगलताई, मधुराताई, अश्विनी ताई, सुमनताई आणि CRP यांचे विशेष योगदान लाभले.


Social Plugin