Type Here to Get Search Results !

कोराडी येथे राणी वीरांगना अवंतीबाई लोधी यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न

* अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन ; घोषणांनी दुमदुमला परिसर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

कोराडी (नागपूर) / मिलिंद गाडेकर :- स्वातंत्र्य संग्रामातील पराक्रमी वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांची पुण्यतिथी कोराडी येथील लोधी समाजभवन, स्टेडियम परिसरात भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाजबांधवांनी एकत्र येत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात राणी वीरांगना अवंतीबाई लोधी यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महादुला नगराध्यक्षांचे पती, उद्योजक व समाजसेवक मनोज सावजी यांच्या हस्ते पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून आदरांजली वाहिली.


“राणी वीरांगना अवंतीबाई लोधी अमर रहे”, “जय राणी वीरांगना अवंतीबाई लोधी”, “जय लोढेश्वर” अशा गगनचुंबी घोषणांनी संपूर्ण कोराडी परिसर दुमदुमून गेला. यामुळे कार्यक्रमात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.


या कार्यक्रमाला राणी वीरांगना अवंतीबाई लोधी समितीचे अध्यक्ष मोरेश्वर बिरखेडे, सचिव महेश घुरिले, आदिनाथ युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह ठाकूर, समाजसेवक मनोज सावजी, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाकांभाले, माजी पंचायत समिती सदस्या केसरकाकू बेलेकर, वासुदेव बेलेकर, सुरेश कांभाले, लोधी युवा संघटनेचे संदीप घुरिले, निरंजन घुरिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश घुरिले यांनी केले. यावेळी शाहू जामदार, चिंतामण बल्लारे, रुपेश मंगरुळे, देवेंद्र नवधिंगे, प्रभू बिलोने, जितेंद्र नवधिंगे, रवी राजपूत, भूषण बिरखेडे, शांताराम नवधिंगे, लक्ष्मण गहारुले, कैलास बासबारीले, लोकेश वऱ्होकर, डॉं. धनुले तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील युवा, तरुण, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement