Type Here to Get Search Results !

रसायनीत आंतरराष्ट्रीय सन्मानांचा भव्य सोहळा

* भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ इंडिया व सम्यक सामाजिक संस्थेचा संयुक्त उपक्रम

खालापूर / प्रतिनिधी :- भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ इंडिया यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 2026 या वर्षीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा वितरण सोहळा रसायनी (मोहोपाडा) येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडला. नेपाळमधील लुंबिनी येथे 22 मार्च रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जाहीर झालेले पुरस्कार सोहळ्यात काही मान्यवरांना उपस्थित राहता न आल्याने रामनवमीच्या शुभमुहूर्तावर 26 मार्च रोजी विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सम्यक सामाजिक संस्था, रसायनी मोहोपाडा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन आणि बुद्धवंदनेने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संघटक गोरख साठे, सल्लागार एन. एम. वाघमारे, अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पत्रकार प्रशांत खराडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. राजमाता जिजाऊ पुरस्कार - मायाताई अच्युत शिरसाट, माता सावित्रीबाई फुले पुरस्कार - रंजना गायकवाड, छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार - सुधीर गोविंद माने (पत्रकार, राष्ट्रीय कोषाध्यक्ष & महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षन्यूज जर्नालिस्ट असोसिएशन), संत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार - माणिक पारसवाल (अकोट), माता रमाई आंबेडकर पुरस्कार - राजनंदा दयानंद तसेच डॉं. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रकाश गायकवाड, राहुल जाधव, गौतम सोनवणे, अजित कडलक, दिलीप निकम, सुरेश प्यारे, सुनील निखाडे, मिलिंद तेलगूरे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय शिळफाटा येथील शंकर कुंडले यांना लहु वस्ताद साळवे पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी समाजसेवा, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. विशेषतः सुधीर माने यांनी पत्रकारितेद्वारे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी रायगड, अकोला, बारामती, अकोट, मोहोपाडा, चांभार्ले आदी भागांतून अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनील निखाडे यांनी केले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement