Type Here to Get Search Results !

तुषार तानाजी कांबळे यांना ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ प्रदान

* नवी दिल्लीतील भव्य सोहळ्यात सामाजिक कार्याची दखल ; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली / प्रतिनिधी :- देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्रातील युवा, प्रभावशाली व बहुआयामी सामाजिक-राजकीय नेते तुषार तानाजी कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

हा प्रतिष्ठित पुरस्कार मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी संघटना, आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) - श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. कांबळे यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न, तसेच पत्रकारितेद्वारे समाजातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.


या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र प्रदेश, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष सतीश केदारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.


पुरस्कार स्विकारल्यानंतर भावना व्यक्त करतांना तुषार तानाजी कांबळे म्हणाले की, हा सन्मान माझ्या सामाजिक कार्याची दखल असून समाजासाठी अधिक निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. ‘तथ्य क्रांती’च्या माध्यमातून सत्य, न्याय आणि जनजागृतीचा मार्ग अधिक वेगाने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील.


कांबळे यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः कोकण परिसरात तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तुषार कांबळे यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून, समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement