* 22 मार्च रोजी उमटे माती बंदर येथे रंगणार थरारक महासंग्राम ; पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना
उमटे / प्रतिनिधी :- गावातील पारंपरिक क्रीडा संस्कृती जपण्यासाठी उमटे येथे भव्य बैलगाडी व घोडागाडी जंगी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. होशी बैलगाडी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ उमटे यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
* रविवारी रंगणार थरारक स्पर्धा :- ही जंगी शर्यत रविवार, 22 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता उमटे गावातील उमटे माती बंदर परिसरात पार पडणार आहे. या स्पर्धेत परिसरातील नामांकित बैलगाडी व घोडागाडी चालक सहभागी होणार असून वेग, कौशल्य आणि पारंपरिक खेळांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
* पारंपरिक खेळांचे जतन करण्याचा उपक्रम :- गावात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बैलगाडी आणि घोडागाडी शर्यती या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या पारंपरिक क्रीडांना पुन्हा चालना मिळावी, तसेच तरुण पिढीला या खेळांची ओळख व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
* स्पर्धक व प्रेक्षकांना आवाहन :- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी स्पर्धक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
* परिसरात उत्साहाचे वातावरण :- या जंगी शर्यतीच्या आयोजनामुळे उमटे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पारंपरिक खेळांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Social Plugin