* चाळीसगावात आनंदाचे वातावरण : सोशल मीडियाची मदत, पोलिस व नागरिकांच्या सहकार्यामुळे शोधमोहीम यशस्वी
चाळीसगाव (जि. जळगाव) / मुझफ्फर अली सैय्यद :- गेल्या काही दिवसांपासून हरवलेला अहतेशाम शेख खलील हा तरुण अखेर सुखरूप घरी परतल्याने कुटुंबियांसह परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 23 मार्च 2026 रोजी हरविल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात आली होती.
अहतेशाम हरविल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माहिती शेअर केली. चाळीसगाव शहर पोलिस, रेल्वे पोलिस तसेच स्थानिक पत्रकार बांधव यांनीही शोधमोहीमेत सक्रिय सहभाग घेतला.
सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून 30 मार्च 2026 रोजी अहतेशाम शेख खलील हा सुखरूप घरी परतला. त्याच्या सुरक्षित परतीमुळे कुटुंबियांनी दिलासा व्यक्त केला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी कुटुंबीयांनी सोशल मीडियावर मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे, पोलिस प्रशासनाचे आणि पत्रकारांचे मनःपूर्वक आभार मानले. “ज्यांनी या शोध मोहिमेत मदत केली, त्यांचे आम्ही कायम ऋणी राहू,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.


Post a Comment
0 Comments