Type Here to Get Search Results !

कासारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया वडिंगेकर यांची निवड

* बहुमताने विजय ; आघाडीची सत्ता कायम, कार्यकर्त्यांकडून जल्लोष

हातकणंगले (कोल्हापूर) / प्रतिनिधी :- हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया उत्तम वडिंगेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. सरपंच अच्युत खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

ज्योतिर्लिंग ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने सुप्रिया वडिंगेकर आणि मनिषा लुगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रियेत सुप्रिया वडिंगेकर यांना सरपंचासह एकूण 6 मते, तर मनिषा लुगडे यांना 4 मते मिळाली. त्यामुळे सुप्रिया वडिंगेकर यांची बहुमताने निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष अच्युत खोत यांनी केली.


माजी उपसरपंच निषाली पोवार यांनी आघाडीत ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी आस्मा मुल्लाणी यांनी सचिव म्हणून काम पाहिले. यावेळी माजी उपसरपंच अभयसिंह माने, विलास खोत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, नेताजी वडगावकर, मारुती वडिंगेकर, सागर वडिंगेकर, तुषार वडिंगेकर, सागर निकम, संदीप पोवार, सचिन जोंधळे, शिवाजी जोंधळे, मोहन जोंधळे, गणेश जोंधळे यांसह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुप्रिया वडिंगेकर यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement