Type Here to Get Search Results !

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

* सिनियर केजीतील 83 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र

पाचोरा / प्रतिनिधी :- तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील सिनियर केजी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आत्मविश्वास आणि यशाचा अभिमान यामुळे संपूर्ण परिसर आनंदोत्सवाने उजळून निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर पदवीप्रदान पोशाख आणि ग्रॅज्युएशन कॅप परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील पहिला टप्पा साजरा केला. “आज आम्ही पदवीधर झालो” या भावनेने प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास खुलून दिसत होता.


* 83 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान :- या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, समन्वयक स्नेहल पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख फरीदा भारमल तसेच वर्षा पाटील यांच्या हस्ते सुमारे 83 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील इयत्तेसाठी शुभेच्छा दिल्या.


* पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू :- आपल्या मुलांचा हा यशस्वी क्षण अनुभवतांना पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले होते. मुलांच्या पहिल्या यशाचा हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.


* सर्वांगीण विकासावर भर - वैशालीताई सुर्यवंशी :- अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. शाळेतील Activity Lab विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, हस्ताक्षर, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भूमिका चौबे यांनी केले, तर आभार पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख फरीदा भारमल यांनी मानले.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement