Type Here to Get Search Results !

पाचोरात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा

* 200+ नोकरीच्या संधी : श्री. गो. से. हायस्कूल (MCVC) व Team Plus HR Services Pvt. Ltd. यांचे 27 मार्च रोजी संयुक्त आयोजन

* 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधरांसाठी मोठी संधी; ‘कमवा व शिका’ योजनेसह स्टायपेंडची सुविधा

पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो. से. हायस्कूल (MCVC / HSC Vocational विभाग) आणि Team Plus HR Services Pvt. Ltd., छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य रोजगार / शिकावू उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा (रेल्वे स्टेशनजवळ) येथे पार पडणार आहे.

* 200 हून अधिक नोकरीच्या संधी :- या रोजगार मेळाव्यात K-Driveसह तीन आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग असणार असून EV बस निर्मिती व इतर औद्योगिक क्षेत्रातील विविध पदांसाठी 200 पेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 17,000 ते 19,600 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार असून, ‘कमवा व शिका’ (B.Voc / D.Voc) योजनेंतर्गत शिक्षणाचीही संधी उपलब्ध होणार आहे.


* पात्रता व वयोमर्यादा :- या मेळाव्यासाठी MCVC (कोणताही ट्रेड), 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार पात्र आहेत. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.


* औद्योगिक प्रशिक्षणाची संधी :- निवड झालेल्या उमेदवारांना बस, कॅन्टीन, ड्रेस, शूज, विमा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पुणे, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक युनिटमध्ये प्रशिक्षण व नोकरीची संधी मिळणार आहे.


या मेळाव्याचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते होणार असून संजय वाघ (चेअरमन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था) ॲंड. महेश देशमुख (सेक्रेटरी, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था), व्ही. टी. जोशी(व्हॉईस चेअरमन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था), खलील देशमुख (चेअरमन शालेय समिती), वासुदेव महाजन (चेअरमन तांत्रिक विभाग समिती) तसेच Team Plus HR Services चे संचालक बाळकृष्ण मुळे उपस्थित राहणार आहेत.


* आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया :- उमेदवारांनी मुलाखतीसाठी बायोडेटा (Resume), आधार / पॅन कार्ड, 12 वी व इतर शैक्षणिक गुणपत्रिका, पासपोर्ट साइज फोटो (2), बँक डिटेल्स, LC ची झेरॉक्स ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी MCVC विभागामार्फत केली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


* सर्वांसाठी मोफत सहभाग :- या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, सर्व उमेदवारांसाठी मोफत सहभागाची सुविधा आहे. जिल्ह्यातील युवकांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांनी सांगितले.


या मेळाव्याचे समन्वयक म्हणून मनिष बाविस्कर, बाळकृष्ण मुळे, शरद माथुरवैश्य यांच्यासह प्राचार्य एन. आर. ठाकरे आणि उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील हे परिश्रम घेत आहेत. नोंदणीसाठी मनिष भा.बाविस्कर सर (Mcvc विभाग प्रमूख) 8275270554, बाळकृष्ण मुळे (संचालक, Team plus HR services pvt Ltd) 9923445447, शरद अ. माथुरवैश्य सर (7972770106) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement