Type Here to Get Search Results !

सक्करबावली येथे रमजान ईद उत्साहात साजरी

* सुन्नी फरीदा मशिदीत रात्रभर इबादत : नमाज, दुवा आणि खीर-खुर्म्याच्या वाटपातून सणाचा आनंद

वर्धा - सक्करबावली / अखिल रोडे :- पवित्र रमजान महिन्याची सांगता सक्करबावली परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात करण्यात आली. शनिवार, 21 मार्च 2026 रोजी रमजान ईदनिमित्त सुन्नी फरीदा मशिदीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रात्रभर नमाज पठण करून अल्लाहची विशेष इबादत केली.

याप्रसंगी मौलाना हाफिज अक्तर कादरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी आपल्या भाषणातून केवळ वैयक्तिक नव्हे तर देशाच्या प्रगतीसाठी आणि सर्वत्र सुख-शांती नांदावी यासाठी विशेष ‘दुवा’ करण्यात आली. मशिद परिसरात यावेळी अत्यंत भक्तीमय आणि पवित्र वातावरण निर्माण झाले होते.


या कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन मशिदीचे अध्यक्ष महफुज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. समाजातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याला साहिल अली, हसन शेख, रासू शेख, जुनेद शेख, मोसिन सिद्दीगी, ऐफाज सैयद, जिशान अली, शाहरुख शेख, अनवर शेख, वसीम सिद्दीगी, राहील शेख, सद्दाम शेख, जानू शेख, फैजान शेख आणि अरमान अली यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.


नमाज आणि इबादत पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांसाठी खीर-खुर्मा वाटप करण्यात आले. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेत सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या निमित्ताने सक्करबावली परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. विविध समाजघटकांनी एकत्र येत सण साजरा केल्याने बंधुभाव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement