* गुलाबाचे फूल देऊन पाहुण्यांचे स्वागत : जामा मशिदीत बंधुभाव, शांतता आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन
उमरेड - सिर्सी / अखिल रोडे :- सिर्सी (ता. उमरेड) येथील जामा मशिदीत रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
याप्रसंगी मौलाना हाफिज मुक्कदस रेयान यांनी उपस्थितांना शांतता, सहिष्णुता आणि बंधुभावाचा संदेश दिला. समाजात प्रेम, सौहार्द आणि परस्पर आदर टिकवून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान मशिदीचे अध्यक्ष शकील खान पठाण आणि सचिव हनीफ मौला शेख यांनी उपस्थित पाहुण्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. या अनोख्या पद्धतीने सणाच्या आनंदात अधिकच भर पडली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अतुल नारनवरे, अमोल कोटेवार (पोलिस कर्मचारी, बेला पोलिस ठाणे) तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश बालपांडे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
ईदचा सण शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी कब्रस्तान येथे जाऊन दुआ (प्रार्थना) अदा केली.
यावेळी अफसर पठाण, जमील तुर्रक, अबीदिन अगवान, आशिक अगवान, गनी भाई, इम्रान पठाण, तोसिफ अगवान, रोशन छवारे, नासिर शेख, नाहिम पठाण, एजाज पठाण, अय्युब अगवान, कादर अगवान, रियाज अगवान, अख्तर अगवान, तोहसीफ, दानिश शेख, रहीम पटेल, जाकीर अगवान, समशेर अगवान, सामसूद्दीन शेख, हासीम शेख, सलमान पठाण, रहमान पठाण, युनूस शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.


Social Plugin