Type Here to Get Search Results !

महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार

* प्रतिभा शेलार यांची महिला आयोग अध्यक्ष पदासाठी शासनाकडे मागणी

सातारा / प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार प्रतिभा सुनील शेलार यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना मेल व लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

प्रतिभा शेलार या गेल्या दहा ते सात वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली “महालक्ष्मी आधार फाउंडेशन”च्या माध्यमातून गरजू व अत्याचारग्रस्त महिलांना मदत, मार्गदर्शन व जनजागृतीचे काम सातत्याने करण्यात येत आहे. याशिवाय, त्यांना पत्रकारितेचा पाच वर्षांचा अनुभव असून, “महालक्ष्मी न्यूज 24”च्या संपादिका म्हणून त्यांनी महिलांवरील अन्याय, अत्याचार व सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवले गेले आहेत.


या पार्श्वभूमीवर महिला प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींना शासनाने संधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास महिलांच्या सन्मान, सुरक्षा व सक्षमीकरणासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीवर शासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार प्रतिभा शेलार यांनी महिला आयोग अध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री व महिला बाल विकास विभागाकडे निवेदन सादर केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement