Type Here to Get Search Results !

इनरव्हील क्लब खोपोलीतर्फे महिला दिनानिमित्त ‘स्पोर्ट्स फिएस्टा’ उत्साहात साजरा

* काटरंग येथे महिलांसाठी विविध खेळ, स्पर्धा

* कर्तृत्ववान महिला धनश्री गौडा यांचा सन्मान

खोपोली / सुधीर माने :- जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब खोपोली यांच्या वतीने महिलांसाठी विशेष ‘स्पोर्ट्स फिएस्टा’ (खेळ उत्सव) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, 14 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता महालक्ष्मी मंदिर, काटरंग येथील मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पोर्ट्स फिएस्टामध्ये 18 वर्षांवरील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महालक्ष्मी मंदिर काटरंगच्या प्रमुख व्यवस्थापक करुणा येरूणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


* विविध खेळ आणि स्पर्धांचा आनंद :- स्पोर्ट्स फिएस्टामध्ये क्लबच्या स्पोर्ट्स इन्चार्ज तसेच उपाध्यक्ष राजश्री मुंदडा आणि पास्ट प्रेसिडेंट सरिका यांनी विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन केले होते. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आनंद लुटला. या कार्यक्रमात खोपोलीतील सुमारे 40 ते 45 महिलांनी सहभाग नोंदवला. स्पर्धांमधील विजेत्यांना क्लबच्या वतीने गोल्ड आणि सिल्वर मेडल, चॉकलेट तसेच रुमाल देऊन गौरविण्यात आले. याशिवाय कार्यक्रमादरम्यान सरप्राइज गेम्स आणि प्रश्नोत्तर स्पर्धाही घेण्यात आल्या आणि त्यांनाही बक्षिसे देण्यात आली.


* धनश्री गौडा यांचा विशेष सन्मान :- जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लबच्या वतीने दरवर्षी एका कर्तृत्ववान महिलेचा सन्मान केला जातो. यंदा जनता ज्युनियर कॉलेजच्या स्पोर्ट्स टीचर धनश्री गौडा (कोंडुस्कर) यांना ‘वंडरफुल स्पोर्ट्स वूमन’ म्हणून गौरविण्यात आले. त्यांना ट्रॉफी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या सुमारे 30 सदस्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये क्लबच्या अध्यक्ष दीना शहा, सेक्रेटरी मधुमिता पाटील, उपाध्यक्ष राजश्री मुंदडा, खजिनदार दीपिका कोठारी तसेच इतर सदस्य उपस्थित होते. तसेच नागरी सामाजिक विकास संस्था अध्यक्ष वर्षा मोरे त्यांच्या संपूर्ण टीमसह उपस्थित होत्या. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेल्या या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये क्रीडा आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement