Type Here to Get Search Results !

संगीतमय भजन संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद

* राम जन्मौत्सवाच्या पूर्वसंध्येला नगरदेवळ्यात भक्तिमय वातावरण

* राम मंदिर चौकात रंगली भव्य भजन संध्या, भाविक श्रीराम नामात तल्लीन

* अभिलाषा रोकडे व महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळाचा पुढाकार

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- अयोध्यापती रघुकुलतिलक प्रभू श्रीरामचंद्र जन्मौत्सव (रामनवमी) पूर्वसंध्येला नगरदेवळा येथील राम मंदिर चौकात आयोजित करण्यात आलेली भव्य संगीतमय भजन संध्या अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रीराम नामाचा गजर करीत आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला.

या भजन संध्येत रामराज्य भजनी मंडळ तसेच शिवराणा भजनी मंडळ यांनी सुमधुर भजन-कीर्तन सादर करीत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून टाकला. श्रीरामांच्या विविध भजनांमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. “श्रीराम जय राम जय जय राम” या गजराने वातावरण दुमदुमून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभू श्रीरामांच्या आरतीने या भजन संध्येचा मंगलमय समारोप करण्यात आला. यावेळी सर्व भाविकांनी एकत्र येत आरतीत सहभाग घेतला आणि भक्तीभावाने प्रभूंचे स्मरण केले.


या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अभिलाषा भिला रोकडे यांच्या शिवकन्या बहुउद्देशीय संस्था तसेच महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या उपक्रमामुळे गावात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


या भजन संध्येमुळे नगरदेवळा परिसरात भक्ती, एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडले. राम जन्मौत्सवाच्या निमित्ताने आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement