Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथे इफ्तार पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश

* वार्ड क्रमांक 3 मधील मदीना मस्जिद परिसरात उत्साहात आयोजन ; विविध समाजातील नागरिकांची मोठी उपस्थिती

नगरदेवळा / प्रतिनिधी :- पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने नगरदेवळा येथील वार्ड क्रमांक 3 मधील मदीना मस्जिद परिसरात आयोजित इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमात विविध धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.

युवा नेते प्रणय दिलीप भांडारकर (मुन्ना भाऊ) यांच्या पुढाकारातून नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटाच्या वतीने बुधवार, 18 मार्च (28 रमजान) रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन मुन्ना भाऊ भांडारकर प्रेमी, अनुप कृषी सेवा केंद्र तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.


या इफ्तार कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसोबतच इतर धर्मीय नागरिकांनी एकत्र येत उपवास सोडला. त्यामुळे गावात बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमादरम्यान एका लहान बाळाने युवा नेते मुन्ना भाऊ भांडारकर यांचा विशेष सत्कार केला. तसेच छोटे रोजेदार अजमत शेख जिब्राईल (जिब्बु दादा) याचाही सन्मान करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच भावनिक उंची मिळाली.


उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व सांगत परस्पर आदर, सहिष्णुता आणि बंधुभाव जोपासण्याचे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सण साजरे केल्यास सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होते, असे मत व्यक्त करण्यात आले.


या कार्यक्रमास युवा नेते प्रणय ऊर्फ मुन्ना भांडारकर यांच्यासह हिंदुस्थान के मशहूर शायर जुबेर अली ताबीश, पाचोरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक भूषण (सनी) दिलीप वाघ, हजरत जमशेर मौलाना, अन्नू मेंबर, शेर खान, रज्जाक शेख, अफजल खान, आसिफ रजा खान, हबीब दादा, गनी शेठ, जिब्राईल शेख, अय्या मास्टर, उमर टेलर, एहतेश्याम शेख, निसार पहेलवान, सलीम बागवान, अली रजा खान, अनीस शेख, इकबाल बागवान, महेबूब भाई, आरीफ खान, गनी टेलर, निसार शेख, महेबूब पिंजारी, दादामियां पिंजारी, लतीफ पिंजारी, मुन्ना काका परदेशी, विलास भामरे, कडू नाना पाटील, बंडू नाना काटकर, राजू महाजन, सुनील आप्पा राऊळ, इंद्रनील भामरे, अशोक सोन्नी, आदित्य परदेशी, मनीष डगवाले, उत्तम समारे, पिंटू तात्या सोन्नी, संजू बापू राऊळ, विलास सोनवणे, मनोज पाटील, हिलाल गायकवाड, सुनील कदम, अभिजीत पवार, अनिल पाटील, शकील बागवान, मुस्ताक खान, अरबाज खान, एतेशाम सर अली, मुख्तार शेख, अदनान रजा, अनिस खाटीक, सलीम शाह, जावेद शाह, पत्रकार मिलींद दुसाणे, प्रकाश जगताप, शैलेंद्र सोनार, फारूख शेख, हसीबूर शेख, पोलिस हरीष दादा, दिनेश पाटील यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement