Type Here to Get Search Results !

नगरदेवळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 'मनसे'ची पॅनल उभारणीची तयारी

* गावातील समस्या, उपाययोजना व संघटन बांधणीवर सविस्तर चर्चा ; कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन

नगरदेवळा / प्रतिनिधी :- मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरदेवळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

बैठकीदरम्यान नगरदेवळा गावातील सध्याची परिस्थिती, विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.


येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यासाठी सध्या पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरू असून कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.


याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तालुका सचिव अभिषेक सतीश बोरसे यांनी गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या-आपल्या वार्डांतील कामे, स्थानिक समस्या आणि जनतेच्या अडचणी याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. तसेच, पक्षाच्या पॅनलसोबत काम करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी पुढे येऊन संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव अभिषेक बोरसे, तालुका उपाध्यक्ष रवी कोळी, नगरदेवळा शहर अध्यक्ष किरण शिंपी, उपाध्यक्ष रमेश भोई, शहर सचिव सागर धनगर यांच्यासह विविध वार्ड प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement