नगरदेवळा / प्रतिनिधी :- पिंपळगाव (ता. पाचोरा) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने उत्साहात पार पडला. समारोपाच्या कार्यक्रमात ह.भ.प. योगेशजी महाराज यांच्या हस्ते भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुन्ना भाऊ भांडारकर यांनी सप्ताहासाठी 5100 रुपयांची देणगी देऊन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला पिंपळगाव येथील बापू माणिक पाटील, शिवाजी रामनाथ गायके, बंटी पाटील, राहुल गायके, बबलू पाटील, भूषण शिंदे, संदीप महाजन, दादा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माजी सरपंच रमेश गबा सोन्नी, माजी उपसरपंच विलास भामरे, इंद्रनील भामरे, कडू नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पिंपळगाव - नगरदेवळा परिसरातील भाविक उपस्थित होते. सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


Social Plugin