Type Here to Get Search Results !

सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय, आर्वी तर्फे भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन


* डॉं. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम ; विजेत्यांसाठी रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह

आर्वी (जि. वर्धा) / प्रतिनिधी :- आर्वी येथील शासनमान्य सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वभूषण भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 1996 पासून सामाजिक व साहित्यिक कार्यात सक्रिय असलेल्या या वाचनालयाने कवी आणि साहित्यप्रेमींना आपले विचार व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

* दोन विषयांवर काव्य स्पर्धा :- या स्पर्धेसाठी दोन महत्त्वाचे विषय निश्चित करण्यात आले असून दोन्ही विषयांतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


विषय १ : ‘ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’

प्रथम पारितोषिक : १००० रुपये - वनप्रभा बहुउद्देशीय संस्था

द्वितीय पारितोषिक : ७०० रुपये - स्मृतीशेष तुषार जिंदे स्मृती प्रीत्यर्थ

तृतीय पारितोषिक : ५०० रुपये - सामाजिक कार्यकर्ते दर्पण टोकसे

प्रोत्साहनपर : ५०० रुपये - कु. निकिता सुनील ढाकणे, नागपूर


विषय २ : ‘आयुष्य घडवणारी पुस्तके’

प्रथम पारितोषिक : १००० रुपये - दिवंगत श्रीरामजी नारे स्मृती प्रीत्यर्थ (मा. किशोर नारे)

द्वितीय पारितोषिक : ७०० रुपये - रंजना मात्रे बनसोड मॅडम

तृतीय पारितोषिक : ५०० रुपये व एक ग्रंथ - पँथर महिला संघटन व सुविद्या सातपुते, नागपूर

प्रोत्साहनपर : ५०० रुपये - सुनील कांबळे, नागपूर

याशिवाय स्मृतीशेष पुनाबाई बारकुजी सोनटक्के यांच्या स्मरणार्थ १० उत्कृष्ट कवितांना विशेष सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


* स्पर्धेचे नियम व अटी :- इच्छुक कवींनी आपल्या स्वलिखित कविता १४ एप्रिल २०२६ पर्यंत टपालाद्वारे पुढील पत्त्यावर पाठवाव्यात. 

सुरेश भिवगडे

ग्रंथपाल, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय

कन्नमवार नगर, आर्वी, जि. वर्धा - ४४२२०१

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ६० रुपये ठेवण्यात आले असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. विजेत्या कवींना बक्षीस वितरण सोहळ्यात आपल्या कवितेचे सादरीकरण करावे लागेल. स्पर्धेत प्राप्त झालेल्या सर्व कवितांचे ई-बुक स्वरूपात प्रकाशन करण्यात येणार आहे.


* परीक्षक म्हणून नामवंत साहित्यिक :- या काव्य स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध गझलकार प्रकाश बनसोड आणि ‘निळाई’ त्रैमासिकाचे संपादक प्रा. प्रवीण कांबळे हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे अध्यक्ष डॉं. प्रवीण काळे, उपाध्यक्ष सहदेवराव भगत, कोषाध्यक्ष भानूदास फुसाटे, सचिव अशोकराव गाडगे तसेच सदस्य प्रमोद खेडकर, रामदास नाखले, संध्या भगत आणि सुशीला दहाट हे विशेष परिश्रम घेत आहेत. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८३०८९१३११५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement