Type Here to Get Search Results !

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, यूडीआयडी नोंदणी अनिवार्य

* अन्यथा 1 एप्रिल 2026 पासून अनुदान स्थगित होणार

पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा शहरासह तालुक्यातील संजय गांधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने पाचोरा येथील संजय गांधी कार्यालयात हजर राहून यूडीआयडी (Unique Disability ID) नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

* यूडीआयडी नोंदणी नसल्यास अनुदान थांबणार :- प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप यूडीआयडी कार्डची नोंदणी पूर्ण केलेली नाही, त्यांचे अनुदान 1 एप्रिल 2026 पासून स्थगित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक तोटा टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.


लाभार्थ्यांनी आधार कार्ड, नवीन यूडीआयडी (Unique Disability ID) कार्ड, बँक पासबुक तसेच आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन पाचोरा येथील संजय गांधी शाखेत भेट द्यावी. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप नवीन यूडीआयडी कार्ड काढलेले नाही, त्यांनी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल कार्यालयात त्वरित अर्ज करून यूडीआयडी कार्ड मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


* प्रशासनाचे नागरिकांना आवाहन :- संजय गांधी योजनेंतर्गत मिळणारे अनुदान नियमित सुरू राहण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. विलंब झाल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्याचे सांगण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement