Type Here to Get Search Results !

कडक उन्हातही लहान मुलींचा अद्भुत निर्धार

* पिंपळनेरमध्ये दोन चिमुकल्यांनी पूर्ण केले रमजानचे रोजे

* 6 आणि 10 वर्षांच्या मुलींची चिकाटी ठरली प्रेरणादायी

* श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे अनोखे उदाहरण

पिंपळनेर / प्रतिनिधी :- कडक उन्हाच्या झळा सहन करीतही दोन लहान मुलींनी संपूर्ण रमजान महिन्यात एकही दिवस न चुकवता रोजे पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या जिद्दीचे व चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

झिनत महेफुज मन्सुरी (वय 6 वर्षे) हिने एवढ्या लहान वयातही दररोज शाळेत जात असतानाच रोजे पाळले. विशेष म्हणजे, संपूर्ण महिन्यात तिने एकही दिवस रोजा सोडला नाही. तिच्या या धैर्याने व श्रद्धेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तिची चुलत बहीण अर्शीन हैदर मन्सुरी (वय 10 वर्षे) हिनेही प्रखर उन्हाची पर्वा न करता संपूर्ण महिनाभर रोजे पाळले. दोघींच्या निर्धारावर उष्णतेचा कोणताही परिणाम झाला नाही.

* श्रद्धा आणि संयमाचे प्रेरणादायी उदाहरण :- या दोन्ही मुलींनी दाखवलेली श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास हे समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे. एवढ्या लहान वयातही त्यांनी दाखवलेली धार्मिक निष्ठा आणि मानसिक ताकद सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

* कुटुंबीयांचा अभिमान :- झिनत महेफुज मन्सुरी ही पिंपळनेर येथील व्यावसायिक महेफुज नसीर मन्सुरी यांची कन्या असून, अर्शीन हैदर मन्सुरी ही त्यांची पुतणी आहे. मुलींच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि समाजातील विविध घटकांकडून या दोन्ही चिमुकल्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळत आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement