Type Here to Get Search Results !

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

* वादग्रस्त वक्तव्यावरून शिवशाही व्यापारी संघाचा निषेध

* युवराज दाखले यांची मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार

पुणे / प्रतिनिधी :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून शिवशाही व्यापारी संघाने तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या संदर्भात संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

* वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झाला संताप :- मिळालेल्या माहितीनुसार भोंदूगिरीचे आरोप असलेल्या अशोक खरात यांच्याशी संबंधित कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांनी केलेले एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या वक्तव्यात त्यांनी “आषाढीला विठ्ठलाचे दर्शन झाले नसेल, मात्र गुरुपौर्णिमेला तुमच्या रूपाने आम्हाला विठ्ठलाचे दर्शन होतेय” असे म्हटल्याचा दावा करण्यात येत आहे.


* महिला आयोगाच्या प्रतिमेला धक्का :- या वक्तव्यामुळे राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप करीत शिवशाही व्यापारी संघाने निषेध व्यक्त केला आहे. तसेच, अशोक खरात यांच्यासोबत असलेले संबंध आणि त्यासंदर्भातील घटनांमुळे जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याचेही संघाचे म्हणणे आहे.


* राजीनाम्याची मागणी :- या पार्श्वभूमीवर युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे.


* सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण :- ही बाब समोर आल्यानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून संबंधित प्रकरणावर प्रशासन आणि सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे महिला आयोगाच्या कामकाजावर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement