* नगरदेवळा येथे सामाजिक बांधिलकी जपत २५ हजारांची आर्थिक मदत ; कुटुंबीयांना दिलासा
नगरदेवळा / प्रतिनिधी :- येथील छत्रपती शिवराय स्वयं सहायता बचत गट (पुरुष) यांच्या वतीने दिवंगत सहयोगी सदस्य राजेंद्र प्रभाकर पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. राजेंद्र प्रभाकर पवार हे बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. गेल्या महिन्यात दीर्घ आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर आलेल्या संकटाची जाणीव ठेवत बचत गटातील सदस्यांनी एकत्र येत मदतीचा निर्णय घेतला. याअंतर्गत बचत गटाच्या खात्यातील त्यांच्या नावे असलेली संवर्धित बचत रक्कम तसेच गटातील 15 सदस्यांच्या वतीने 25 हजार रुपयांची रोख मदत दिवंगत पवार यांच्या पत्नी सरला पवार आणि समीर पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.
या प्रसंगी दिवंगत राजेंद्र पवार यांचे ज्येष्ठ बंधू सिद्धार्थ पवार, मंगलताई सिद्धार्थ पवार, अभिजीत पवार उपस्थित होते. तसेच बचत गटाचे अध्यक्ष अनिल चव्हाण, सचिव संदीप प्रतापसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रमोद सिताराम पाटील, कोषाध्यक्ष सुनील हेमराज पाटील यांच्यासह संजय सोनार, अशोक सोन्नी, निलेश परदेशी, प्रकाश पाटील, डॉं. रामकृष्ण रणदीवे, रईस बेग, शैलेंद्र बिरारी, मोहन तावडे, सुभाष पाटील, दिनेश जळोदकर, दिनकर पाटील आदी सदस्य उपस्थित होते.


Social Plugin