Type Here to Get Search Results !

कष्ट, कर्तृत्व आणि कलेचा सुंदर संगम

* डॉं. कादंबरी महाजन यांची प्रेरणादायी यशोगाथा

* फिजिओथेरपी, कला आणि क्रीडा क्षेत्रात बहुआयामी यश

* तरुणाईसाठी आदर्श ठरलेली पाचोर्‍याची कन्या

पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा येथील प्रतिष्ठित व शैक्षणिक परंपरा लाभलेल्या कुटुंबातील कन्या डॉं. कादंबरी संदीप महाजन यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि बहुआयामी गुणांच्या जोरावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन करीत तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार, ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर संदीप दामोदर महाजन आणि श्री गो. से. हायस्कूलच्या उपशिक्षिका शितल महाजन यांच्या कन्या असलेल्या कादंबरी यांनी आपल्या कुटुंबाच्या सामाजिक व शैक्षणिक परंपरेला साजेसा मान उंचावला आहे.


डॉं. कादंबरी महाजन यांनी नवी मुंबई येथील एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपीमधून Bachelor of Physiotherapy (BPT) पदवी 8.04 CGPA सह यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. शिक्षणादरम्यान त्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता क्लिनिकल अनुभवावर विशेष भर दिला. रुग्णांचे assessment, treatment planning आणि rehabilitation प्रक्रियेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः neurological conditions आणि musculoskeletal injuries या क्षेत्रांमध्ये त्यांनी सखोल अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. Patient handling, communication skills आणि therapeutic approach या महत्त्वाच्या कौशल्यांमुळे त्या एक सक्षम फिजिओथेरपिस्ट म्हणून उदयास आल्या आहेत.


डॉं. कादंबरी यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. विविध medical camps मध्ये volunteer म्हणून काम करतांना त्यांनी रुग्णांचे मार्गदर्शन, प्राथमिक उपचार तसेच posture, exercise आणि injury prevention याबाबत जनजागृती केली. Healthcare professionals सोबत समन्वय साधत community care देण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले आहे.


वैद्यकीय क्षेत्राबरोबरच कादंबरी यांची कला क्षेत्रातील आवडही तितकीच उल्लेखनीय आहे. त्या सध्या अंधेरी येथे डान्स कोरिओग्राफीचे प्रशिक्षण घेत असून सुमीत खेतान यांच्या Events & Talent Management संस्थेमार्फत त्यांनी दुबई, बहरेन, कतार आणि अबुधाबी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केले आहे. तसेच विविध नामांकित national व international कंपन्यांच्या Brand Ambassador म्हणून त्यांनी काम केले असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरण कौशल्याची दखल घेतली गेली आहे. गोरेगाव स्पोर्ट क्लब येथे आयोजित गीत-नृत्य नाट्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


* क्रीडा क्षेत्रात नेतृत्वाची छाप :- कादंबरी महाजन यांनी केवळ शिक्षण व कला नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. दिल्ली (नोएडा) येथे पार पडलेल्या खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद भूषवले, जे त्यांच्या नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण आहे.


* भविष्यासाठी स्पष्ट ध्येय :- डॉं. कादंबरी यांचा पुढील प्रवासही तितकाच दूरदर्शी आहे. त्या Post Graduation करण्याचा मानस ठेवत असून डान्स कोरिओग्राफी क्षेत्रातही करिअर घडविण्याचा त्यांचा निर्धार आहे. भविष्यात स्वतःचे Dance व Zumba classes सुरू करून समाजातील सर्व वयोगटांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा संकल्प आहे.


* कुटुंबाचे संस्कार आणि पाठबळ महत्त्वाचे :- त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, तसेच बहीण डॉं. वैष्णवी यांचे मार्गदर्शन व पाठबळ हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. कष्ट, सातत्य आणि समर्पण यांच्या जोरावर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


* तरुणाईसाठी प्रेरणादायी आदर्श :- डॉं. कादंबरी महाजन यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. शिक्षण, कला आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रात संतुलन साधत यश मिळवणे शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त होत असून, भविष्यात त्यांचे यश आणखी उंच शिखरे गाठेल, याबद्दल सर्वत्र विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement