Type Here to Get Search Results !

कोकण मराठी साहित्य परिषद रायगडतर्फे महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव

* पनवेल येथील जिल्हा बैठकीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार ; खोपोली शाखेतील महिलांचाही सन्मान

पनवेल / सुधीर माने :- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रायगड जिल्हा शाखेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार पनवेल येथे आयोजित जिल्हा बैठकीत करण्यात आला. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील विविध शाखांमधील महिलांना सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

या कार्यक्रमात खोपोली शाखेतील पाच महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये खोपोली शाखेच्या माजी अध्यक्षा रेखा कोरे, सदस्य निशा दळवी आणि भारती शहा यांचा सत्कार कोमसाप रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गणेश कोळी (जिल्हा प्रतिनिधी), संध्या देवकर (महिला प्रमुख), सुभाष कुडके (अध्यक्ष - कोमसाप पनवेल शाखा) तसेच रायगड जिल्ह्यातील विविध शाखांतील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


* खोपोली शाखेतही महिलांचा गौरव :- ज्या महिला काही कारणास्तव पनवेल येथील कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांचा सत्कार कोमसाप खोपोली शाखेच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी खोपोली शाखेचे अध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये यांच्या हस्ते माजी अध्यक्षा उज्वलाताई दिघे आणि सदस्य मधुमिता पाटील यांचा सन्मान करण्यात आला.


* क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव :- याच बैठकीत विश्वजित पोळ यांनी 10 किलोमीटर सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही महिला सदस्यांचाही गौरव करण्यात आला. याशिवाय शाखेतील ज्या सदस्यांचे वाढदिवस होते, त्यांना गिफ्ट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे कार्यक्रमाचे वातावरण अधिक आनंददायी झाले.

या कार्यक्रमास शाखाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये, सचिव नरेंद्र हर्डीकर, खजिनदार सुरेश चव्हाण, माजी अध्यक्षा उज्वलाताई दिघे, वामनराव दिघे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement