Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात तरावीह नमाज पठण करणाऱ्या इमामांचा अल खिदमत फाउंडेशनतर्फे सन्मान

* रमजान महिन्यातील धार्मिक सेवेसाठी कृतज्ञता

* विविध मस्जिदींमध्ये कुरआन तिलावत व नमाज

नगरदेवळा / प्रतिनिधी :- पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथे विविध मस्जिदींमध्ये 30 दिवस तरावीह नमाज व कुरआन तिलावत (पठण) करणाऱ्या इमाम, मौलाना व हाफिज साहेबांचा नगरदेवळा अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

* मस्जिदींमध्ये नियमित तरावीह नमाज व कुरआन पठण :- रमजान महिन्यात दररोज रात्री अदा केली जाणारी तरावीह नमाज ही मुस्लिम समाजातील अत्यंत महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे. या नमाजदरम्यान संपूर्ण कुरआन शरीफचे तिलावत (पठण) केली जाते. नगरदेवळा येथील जामा मस्जिद, मदीना मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, मनियार मस्जिद आणि नूरानी मस्जिद येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा करत आहेत.


* इमाम व धार्मिक सेवकांचा सन्मान :- या सर्व मस्जिदींमध्ये सेवा देणाऱ्या इमाम, मौलाना, हाफिज साहेब, काजी साहेब तसेच मौजन (अजान देणारे) यांचा अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सेवेमुळे समाजात धार्मिक वातावरण निर्माण होऊन श्रद्धा आणि एकात्मता दृढ होत असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.


* अल खिदमत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार :- या सन्मान कार्यक्रमासाठी अल खिदमत फाउंडेशनचे सदस्य सूफियान शेख, फरीद खान, सईद मिस्त्री, अनीस बागवान, सैय्यद दानिश, अबरार खान यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सर्व इमाम व धार्मिक सेवकांचे आभार मानत रमजान महिन्यातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement